पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर
दि. २४/११/२०२२ रोजी गैरा लिजंट सोसायटीचे पार्कींग मध्ये व योगी पार्क सोसायटी समोर सार्वजनिक रोडवर गंभीर जखमी इसम यास आरोपी नामे १. अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या, वय-२३ वर्षे, रा. लोकसेवा तरूण मंडळा जवळ, १३. ताडीवाला रोड, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २ नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के, वय ३२, रा. सदर ३. संतोष सिध्दार्थ चव्हाण, वय-२७, रा. १३. ताडीवाला रोड पुणे ४. अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडणी वय २६, रा. सदर ५.नटी उर्फ रोहन उर्फ ऋषीकेश मोहन निगडे, वय २८, रा. सदर ( अटक) व इतर एक पाहिजे आरोपी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्यास प्रथम लाथा बुक्क्यांनी मारुन त्याचेवर अग्निशस्त्रातून फायर करून व नंतर त्याचे डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक मारून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने, सदरबाबत कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२९ / २०२२ भादवि कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ (२) महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) १३५, भारतीय हत्यार का. ३ (२५). क्रिमीनल अॅम क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद आरोपी यांनी वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आ.क्र.१ ते ५ यांना अटक करण्यात आली असुन आ.क्र.६ हा पाहिजे आरोपी आहे. त्यांचेविरुध्द शरिराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्यातील केले तपासात आरोपी नामे अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या (टोळी प्रमुख) याचेवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी नितीन उर्फ नहा मोहन म्हस्के याचेविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे नटी उर्फ ऋषिकेश मोहन निगडे याचेविरूध्द वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दरोडा व गर्दी मारामारी यासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत व पाहिजे आरोपी याचेविरूध्द वेग-वेगळ्या पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत, नमुद आरोपींविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु त्यांनी त्यांच्या जवळ घातक अग्निशस्त्रे बाळगून शरिराविरूध्दचे गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली होती.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ड्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२) व ३(४) चा अंतर्भाव करणेकामी कोरेगांव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक वेताळ यांनी मा श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परि २. पुणे यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे यांना सादर करण्यात आला होता. सदर प्रकरणाची छाननी करून वरील टोळीविरुध्द कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२९ / २०२२ भादवि कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ (२). महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) १३५. भारतीय हत्यार का. ३ (२५) क्रिमीनल अॅम क.३ व ७ या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(ii). ३(२) व ३ ( ४ ) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, श्री. आर. एन. राजे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त, परि-२, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग श्री. आर. एन. राजे यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन, श्री. विनायक वेताळ, पोलीस उप-निरीक्षक संभाजी नाईक, पोलीस अंमलदार, संदीप दळवी, संजय दगडे, अमर क्षिरसागर व बालाजी घोडके यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही तिसरी कारवाई आहे.