पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
दि.२७.११.२०२२ रोजी रात्री २०/०० वा सुमारास पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे ८ ते ९ साथीदार हे आकाशनगर, जुना जकात नाका, वारजे, पुणे येथील फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी फिर्यादीच्या भावासोबत झालेला जुना वाद उकरून काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचा जिव घेण्याच्या उददेशने मोठा दगड फिर्यादीच्या दिशेने फेकून मारला, मात्र तो दगड फिर्यादीने चुकवला त्याचा राग येवून पप्याने तोच दगड फिर्यादीच्या मोटार सायकलवर परत परत मारून मोटारसायकलचे नुकसान केले. व पप्याबरोबर असलेल्या ८ ते ९ साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवला व त्यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून ” पप्युभाई हा इथला भाई आहे” असे म्हणुन “पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन” असे म्हणून परिसरात दहशत पसरविली व आरडाओरडा करत तेथून निघून गेले, वैभव उकरे उर्फ पप्या तसेच त्याचे सोबत असणारे साथीदारांविरोधात फिर्यादीने कायदेशिर तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो.स्टे ४१०/२०२२ कलम ३०७ ४२७, ३३६, ३३७, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४(२५) म.पो. का. क ३७ (+) (३) / १३५ सह, क्रि. लॉ. अमे अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे, सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे १) वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे, वय २४ वर्षे रा.दुर्गामाता मंदिरामागे, बडारवस्ती कर्वेनगर, पुणे २) आशितोष नारायण साठे, तय १९ वर्षे रा. मु.पो. कुळे, ता. मुळशी, जि पुणे सध्या घर नं ०३, चायनिज बिल्डींग, तीसरा मजला, कर्वेनगर, पुणे (३) गणेश उत्तम माने, वय २२ वर्षे, रा. विश्व कॉलनी, आकाशनगर, वारजे, पुणे यांना अटक करण्यात आली असून ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. तसेच विधिसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.
वर नमूद अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे (टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री. डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांनी मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परि-३ पुणे शहर यांचे मार्फतीने मा. श्री राजेंद्र डहाळे साहेब, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे, (टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली
प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11). ३ (४) या कलगाचा समावेश करणे बाबत मा. श्री राजेंद्र डहाळे साहेब. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ४७० / २०२२ या गुन्हयामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ठ करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती रुक्मिणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त. कोथरूड विभाग पुणे शहर हे करीत आहेत.. मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन
होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सदरची कामगीरी मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, गा.श्री. संदिप कर्णीक, सहआयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र डहाळे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त परि-३, पुणे शहर, मा. श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार मोना सचिन कुदळे, पोना अगोल मिसे, पोशि नितीन कातुर्डे, पोशि गोविंद कपाटे व महिला पोशि प्रियांका कोल्हे यांनी केली आहे.