पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे:– मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कॉम्बींग ऑपरेशन राबविण्याची सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे दिनांक १९/०१/२०२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पो. हवा. ५८१९ मारुती पारधी, पो.शि.८१२९ नितेश जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जंगली पदार्थ रेकॉर्डवरील टांझानीयन इसम नामे बेका हमीस फॉऊमी जामिनावर सुटला असुन तो पुणे कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर, धर्माशी सिग्नेचर सोसायटीचे समोरील सार्वजनिक रोडवर कोकेन या अंमली पदार्थ विक्री करीत आहे. त्या नुसार प्राप्त झालेल्या बातमीचे अनुषंगाने पो.हवा. ५८१९ मारुती पारधी, पो.शि.८१२९ नितेश जाधव यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविला असता ते स्वता सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ यांचेसह छापा कारवाई करणे करीता कायदेशीर सोपस्कर पार पाडुन रवाना झाले.
नमुद प्रमाणे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पुणे कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर, धर्माशी सिग्नेचर सोसायटीचे समोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डवरील टांझानीयन इसम नामे बेका हमीस फॉऊमी हा त्याचे साथीदारासह संशयितरीत्या उभा असलेला दिसला. त्याबाबत पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे व अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफने छापा कारवाई करुन टांझानीयन इसम नामे १) बेका हमीस फॉऊमी वय ४६ वर्षे, सध्या रा. फ्लॅट नं. ३०५ धर्माशी सिग्नेचर सोसायटी साईबाबा नगर कोंढवा खुर्द पुणे. मुळ रा. टांझानिया देश २ ) अरशद अहमद इकबाल खान वय ४२ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०५ धर्माशी सिग्नेचर सोसायटी साईबाबा नगर कोंढवा खुर्द पुणे. यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यात एकुण ७,५८,६००/- रु चा ऐवज त्यामध्ये अनु. क्र. ०१ याचे ताब्यात ३१ ग्रॅम २६० मिलीग्रॅम कोकेन कि. रु ६,२५,२००/- चा एक मोबाईल फोन कि.रु. १०,०००/- चा २००/- रू किंमतीच्या रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या छोटया डब्या, अनु.क्र.०२ याचे ताब्यात ०५ ग्रॅम ६६० मिलीग्रॅम कोकेन कि. रु.१,१३,२००/- रु चा व एक मोबाईल फोन किं. रु.१०,०००/- चा असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आले. त्याबाबत पो हवा ३१५८ मनोजकुमर साळुंके यांनी कोढवा पो.स्टे. येथे दिलेल्या तक्रारी वरुन इसम नामे बेका हमीस फॉऊमी, व अरशद अहमद इकबाल खान यांचे विरुध्द एन. डी. पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टांझानीयन आरोपीवर यापुर्वी कोंढवा पोलीस ठाणे येथे कोकेन व एम.डी या अंमली पदार्थाचे तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल असुन नुकताच तो येरवडा कारागृहातुन जामीनावर मुक्त झाला आहे…
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, योगेश मोहिते, विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख यांनी केली आहे.