पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पूणे :- दिनांक २३/११/२०२२ रोजी गायमुख चौक, आंबेगाव, पुणे येथे फिर्यादी यांना आरोपी नाना दळवी, प्रेम शिंदे, आकाश काटकर यांनी पानशेत येथे झालेल्या भांडणे मिटवल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने मारहाण करुन आरोपी नाना दळवी याने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील लोखंडी कोयता फिर्यादी यांचे पाठीवर व किरण भंडारी याचे मानेवर मारुन त्यास जखमी केले होते. सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ७८७/२०२२, भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४,३४ शस्त्र अधिनियम ४२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७-१- सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे दाखल गुन्हयामध्ये पाहीजे आरोपी याचा शोध घेणेकामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंगलदार यांना योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्याअनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार है। पाहीजे आरोपी प्रेम अंकुश शिंदे, रा. चक्रधर शाळेजवळ, दत्तनगर, पुणे मुळगाव-खरीव पावे, ता. वेल्हा, पुणे याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना आरोपी प्रेम शिंदे हा सध्या शिवापुर वाडा, नवकार पार्क, फ्लॅट नं.३०२ येथे कुटुंबासह राहण्यास आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयामध्ये अटक केली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, सचिन धामणे है करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सचिन धामणे, पोलीस उप निरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे..