पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतीबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय खोमणे यांचे आदेशानुसार तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे यांचे पथक हद्दीत गस्त करीत असताना, दत्तवाडी पो स्टे गुरनं. ३० / २०२३, भादवि कलम ३७९ मधील गुन्ह्यात चोरीस गेलेली अॅटोरिक्षा क्रमांक एम.एच.१२ / टी. यु./६३४४ हीचे चोरी बाबत पोलीस अमलदार प्रकाश मरगजे व किशोर वळे यांनी गाडीचे चोरीचे ठिकाणापासून तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास केला असता, सदर रिक्षा ही मांजरी हडपसर पुणे या भागात असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सलग दोन दिवस मांजरी, हडपसर, गोपाळपट्टी, सोलापुर रोड येथे थांबुन दि. २३/०१/२०२३ रोजी एक नविन विना नंबरची अॅटो रिक्षा गोपाळपट्टी मांजरीचे दिशेने चाललेली दिसल्याने तिचा पाठलाग करून आदर पुनावाला गेट समोर डेरे बंगल्या शेजारी. मांजरी रोड, गोपाळपट्टी मांजरी येथे रोडवर शिताफीने पकडले..
सदर आरोपीकडे अॅटो रिक्षाचे कागद पत्रांबाबत विचारपुस करता तो उडवा उडविची उत्तरे देत असल्याने त्या अॅटो रिक्षाची चालकाचे शिट खाली लॉकच्या कप्यात दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या अॅटो रिक्षाच्या दोन नंबर प्लेट मिळून आल्याने त्याचेवर संशय बळावल्याने सदर अॅटो रिक्षा व चालकारा तपास कामी दत्तवाडी पोलीस ठाणे येथे आणले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन चोरीस गेलेली २,००,०००/- किमतीची रिक्षा परत मिळाली आहे. तसेच आरोपीने याआधी याप्रकारे काही गुन्हे केले अगर कसे याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि ३, श्री. सुहेल शर्मा, मा.सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक, गुन्हे, विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, अमोल दबडे, सद्दाम शेख, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे पाटील, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, प्रमोद भोसले व ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.