पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर
पुणे :- शहर व परिसरात प्रजासत्ताक दिनाचे दिवशी बेकायदेशीरपणे दारु विक्री करणा-यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठांचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-र प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील, पोउपनिरी. नितीन कांबळे व युनिट-२ कडील पोलीस अंमलदार यांना वरिष्ठांचे आदेशान्वये कायदेशीर कारवाईबाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस अंमलदार समीर पटेल व कादिर शेख यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे लष्कर पोलीस स्टेशन हददीत मोदिखाना येथे छापा टाकुन इसम नामै रोहित हनुमंत धोत्रे, वय २८, रा. ३८९, न्यु मोदिखाना कॅम्प, पुणे यांस ताब्यात घेवुन त्याचे कडुन ९९.८२०/- रुपये किये बेकायदेशीपणे देशी-विदेशी दारु विक्री करीत असताना मिळुन आल्याने त्याचेविरूध्द लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा २५/२०२३, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करून लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशन यांच मार्फतीने चालु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री अमोल झेंडे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर, पो.उप निरी. नितीन कांबळे, युनिट-२ कडील पोलीस अंमलदार, शंकर नेवसे, कादिर शेख, समीर पटेल, आबा मोकाशी, साधना ताम्हाणे, उत्तम तारु व नागनाथ राख या पथकाने केली आहे.

