पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येरवडा परिसरात कल्याणीनगर येथे दि. ०१/०१/२०२३ रोजी पहाटे ०४.४५ वा चे सुमारास फिर्यादी हे मित्रासोबत थांबले असताना अनोळखी मुलांनी दुचाकी वरुन येवून फिर्यादी, त्याचा मित्र यांना शिवीगाळ मारहाण करुन फिर्यादीला दुखापत करून रियलमी कंपनीचा मोबाईल हिसकावून घेवून गेले म्हणून येरवडा पो स्टे गुर नं ०७ / २०२३ भादवि ३९४,३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व पोना किरण घुटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी हे बोपखेल भागात राहत असून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता १ मोनु सुमित डिंगीया वय २५ वर्षे २. अभिषेक बादशहा गोहर वय १९ वर्षे ३. अमित रमेश सारसार वय २३ वर्षे ४, विकास राजेश खरे वय २१ वर्षे सर्व राहणार रामनगर, बोपखेल, पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अंगझडतीत मिळालेल्या मोबाईलबाबत चौकशी करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींना दि. २८/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला ७,०००/- रू किंमतीचा मोबाईल, गुन्हयात वापरलेली ४०,०००/- रु किंमतीच्या डिओ आणि स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ४७,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र आळेकर करत आहेत.
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे सो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, तुषार खराडे, पोना अमजद शेख, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, प्रविण खाटमोडे, पोअ अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे.