पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरिल आरोपी नामे विनोद शिवाजी जामदारे वय ३२वर्षे, रा. सर्वेद्य लॉन्स, वडगाव, पुणे, मुळगाव मु.पो. लोणारवाडी, ता. परांड, जि. उस्मानाबाद व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन, त्यांनी दि. १६ / ११ / २०२२ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रासह गप्पा मारत बसले असताना, फिर्यादी यांना मला ओळखतो का लय माज आला काय तुझी आज गेमच वाजवितो असे म्हणुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात धारधार शस्त्राच्या उलट्या बाजुने मारून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली म्हणुन फिर्यादी यांचे आरोपी विरुध्द सिंहगड पो स्टे गुन्हे दाखल केल्याने, त्यांचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४८३ / २०२२, मादवि क. ३०७,५०४, ५०६ (२), ३४, ऑर्म अॅक्ट ४(२५) महा.पो. का. क. ३७(१) (३) १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट का. क. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) विनोद शिवाजी जामदारे, वय-३२ वर्षे, रा. सर्वेद्य लॉन्स, वडगाव, पुणे, मुळगाव मु.पो. लोणारवाडी, ता. परांड, जि. उस्मानाबाद (टोळी प्रमुख) २) आकाश सुभाष गाडे वय २१ वर्ष, रा. रामनगर, माणीकवाग, सिंहगड रोड, पुणे ३)गणेश दिलीप म्हसकर, वय-२३ वर्षे, रा. फ्लॅट नं. १९ कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, पुणे, मुळगाव-मु.पो. अंबी, पानशेत, ता. बेल्हा, जि. पुणे यांना वरील गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी विनोद शिवाजी जामदार (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असून अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतः किंवा टोळीतील सदस्यांना चिथावणी देवून, गुन्हेगारी टोळीचे फायदयासाठी वडगांव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, महादेवनगर, सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे व हवेली या परिसरा मध्ये दहशत निर्माण व्हावी व आर्थिक फायदा व्हावा यासाठी संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून धमकी देवुन, धाकदपटशा करून, जुलुम जबरदस्ती करुन, बड़गांव, चायरी, हिंगणे व सिंहगड रोड परिसरातील स्थानिक रहीवाशी, व्यवसाईक यांना दमदाटी व मारहाण करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), जयंत राजुरकर यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे. श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेंद्र डहाळे यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं.४८३/ २०२२ मादविक ३०७,५०४, ५०६ (२), ३४, ऑर्म अॅक्ट ४ (२५) महा. पो. का. क. ३७(१) (३) १३५ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट का. क. ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजेंद्र गलांडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, पुणे
शहर हे करीत आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेद्र डहाळे, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०३. पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे श्री. राजेंद्र गलांडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पो. निरी. सचिन निकम यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे पो.उप निरी. गणेश मोकाशी, महिला पोलीस अंमलदार, मिनाक्षी महाडीक, पोलीस अंमलदार, स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. आजपर्यंत त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १० वी कारवाई आहे.

