पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. श्री. गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-०४, पुणे शहर यांनी अभिलेखावरील आरोपी यांचा शोध घेऊन मिळुन आल्यास पुढील कायदेशीर कारवाईचे व गंभीर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते, प्राप्त आदेशाप्रमाणे सहा. पोलीस फौज महेंद्र पवार पोलीस अंमलदार, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे असे पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. सुमारे ०८ ते १० दिवसांपुर्वी मकोका गुन्हया मधील आरोपी संतोष पवार यास पुणे ग्रामीण हद्दीतील खानापुर येथे तपासा करीता आणले असताना, त्यास पोलीसांचे कस्टडीतुन गाडीवरुन पळवून नेणारे चिक्या रणधीर व पिल्लुडया धिवार हे बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे शेजारील पान टपरी जवळ उभे आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने आरोपी नामे १ प्रणव ऊर्फ चिक्या अर्जुन रणधीर, वय १९ वर्षे, रा. बुध्द वरती, खानापुर, ता. हवेली, जि. पुणे २ तन्मय ऊर्फ पिल्लुडया तानाजी धिवार, वय- १९ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे प्राथमिक तपास करता, मार्केटयार्ड पोलीस ठाणेकडील मकोका कारवाई अंतर्गत पोलीस कस्टडीतील आरोपी नामे संतोष बाळु पवार, वय २३ वर्षे, रा. खानापुर, ता. हवेली, जि.पुणे व साई राजेंद्र कुंभार, वय १९ वर्षे, रा. सदर यांना दिनांक ०३/०२ / २०२३ रोजी खानापुर, ता. हवेली, जि.पुणे येथे मोक्का गुन्हयाचे तपासा करीता पोलीसांनी आणले होते.
त्यावेळी संतोष पवार याने पोलीसांना ढकलुन, त्याचे हातातील बेडीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीसांना मारहाण करून स्वतःची सुटका करुन घेतली. प्रणव ऊर्फ विक्या अर्जुन रणधीर व तन्मय ऊर्फ पिल्लुडया धिवार या आरोपींनी संगनमत करुन पोलीसांचे कायदेशीर रखवालीतील आरोपी संतोष पवार यास स्कुटरवर ट्रिपल सिट बसवुन पळुन जाण्यास मदत केली..
सदरबाबत हवेली पोलीस ठाणे गु.र.नं. ४२/२०२३.भा.द.वि. कलम३०७,३५३.३३२,२२४.२२५.३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन ते यापुर्वी दाखल असलेल्या हवेली पोलीस ठाणे गु.र.नं. ०६/२०२३. भा.द.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, क्रिमिनल लॉ अॅमें. अॅक्ट सन २०१३ चे कलम ३ व ७ भारताचा हत्यार कायदा कलम ४ / २५ या गुन्हयातील पाहिजे
आरोपी असल्याने, त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता हवेली पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले
पुढील तपास हवेली पोलीस ठाणे करीत आहे..
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री.. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २, श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली राहा. पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन व स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.