मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील गोलाकर्जी येथे संस्थाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले आहे. लोक समग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व मानोस यूनिदास. यांचे संयुक्त विद्यमाने एनविसांगिंग हेअल्थ अँड वेल बेजिंग ऑफ ट्रायबल कोम्मुनिस . प्रकल्पा अंतर्गत मौजा. गोला कर्जी येथे दिनांक 9/2/2023 ला असीसी सेवासदन हॉस्पिटल यांचे मार्गदर्शनात ” मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात डॉ. ग्लूनज, सिस्टर मेरी, सिस्टर मोनिका, प्रीती सिस्टर, मा. राकेश सिडाम (उप सरपंच खंदला ग्रां प), सुरभी स्विपकर (CHO), कोकोडे (ANM), वंदना आत्राम,(सचिव ग्राम संघ), उपास्थित होते.
प्रकल्प समन्वयक श्री मधुकर गोपले यांनी शिबिरा विषयी माहिती सांगितली त्यानंतर मेरी सिस्टर यांनी कुस्टरोग, टी बी, आरोग्य विषयी माहिती माहिती देण्यात आले आहे., महिलांचे आरोग्य मासिक पाळी विषयी मार्गदर्शन केले. 34 किशोरी, महिलांना सानिटरी प्याड्स चे वितरण केले.
आसिसी सेवासदन हॉस्पिटल चे डॉक्टर यांनी प्रामुख्याने गरोदर महिला, बालके, वृध्द व्यक्ती यांची तपासणी करून औषधी देण्यात आली, सुरभी स्विपकार यांनी 57 रुग्णांची बी पी, शुगर तपासणी या ठिकाणी बी पी चे रुग्ण जास्त अढळ ले. या शिबिरात 80 महिला, पुरुष, वृध्द, बालके गरोदर महिला यांनी मोठया प्रमाणात आरोग्याचा लाभ घेतला.