मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली येथे भूमकाल आंदोलनाचे महानायक, आदिवासी समाजाचे क्रांतिकारी शहीद गुंडाधुर दुर्वे यांच्या ११३ व्या शहीद दिनानिमित्त – शहीद भुमकल दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कोरेपल्ली गावाचा भुमिया श्री दामा गावडे यांच्या शुभ हस्ते शहीद गुंडाधुर दुर्वे यांच्या फोटो ला पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला
आयोजित या कार्यक्रमात भुमकल आंदोलन आणि शहीद गुंडाधुर दुर्वे यांच्या इतिहासा बदल थोडक्यात माहिती उपस्थितांना देण्यात आले. यावेळी कार्यक्रमात येरमनार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, आरेंदा चे सरपंच श्री व्यंकटेश तलांडी, जी.प. शाळा कोरेपल्ली चे मुख्यध्यापक श्री रमेश सोयाम सर, रामा कुळमेथे सर, मेंढे सर, अंगणवाडी सेविका – कू. कलावती मोतकुरवार, आसा वर्कर कू. संगीता कुळमेथे, श्री लक्ष्मण आत्राम, श्री लच्या आत्राम, श्री वारलु तलांडी, श्री इरपा गावडे, श्री बंडे गावडे, श्री झुरू गावडे, श्री सुधाकर गावडे, श्री बीच्यू गावडे, श्री सुधीर आत्राम, श्री साईनाथ गावडे, सौ. बंडे गावडे, सौ. बेबी गावडे, सौ. कुम्मे कुळमेथे व तसेच मौजा – कोरेपल्ली, कवटाराम, आसा, सकिनगटटा, पालेकसा या गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.