पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो यांनी गुन्हयात पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस ठाणेस आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, विक्रात देशमुख, पोलीस उप आयुक्त परि.०५ श्रीमती पोर्णिमा तावरे, सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे असे वेळोवेळी पाहिजे फरारी आरोपी यांचा गुप्त माहिती काढून शोध घेत असताना १)कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७९५ / २०१८ भादवि कलम ३९४,३४, २) कोंडवा पोलीस ठाणे गुरन.८४५ / २०१८ भादवि कलम ३९४.३४, ३) राजगड पोलीस ठाणे गुरन. ३५/२०१९ भादवि कलम ३९४.३४ प्रमाणे दाखल असणा-या ३ जबरी चोरीच्या गुन्हयात आरोपी अविनाश धनाजी शिंदे, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी पुणे हा ५ वर्षेपासून फरारी होता. तो सुंदरनगर, मांगडेवाडी येथील त्याच्या प्राप्त पत्यावर राहत नव्हता. तो उदरगाव, ता. म्हाडा, जि. सोलापुर येथे शेतात मजुरीचे काम करित असल्याबाबतची माहिती पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व राहुल रासगे यांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठाच्या परवानगीने सोलापुर म्हाडा येथे जावुन स्थानिक पोलीसाच्या मदतीने आरोपी यांचा शोध घेतला असता नमुद आरोपी हा शेतात काम करित असल्याचे व शेतात असणा-याच घरात राहत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेवुन कोंढवा पोलीस ठाणे येथे नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपी यांच्या विरुध्द यापूर्वी भारती विदयापीठ पोलीस ठाणे, वाकड पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे, राजगड पोलीस ठाणे येथे जबरी चोरी, दरोडयाचा प्रयत्न, खून, दरोडयाचा प्रयत्न व शरिरा विरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करित आहेत.