✒️प्रशांत जगताप, मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन टेडी डे विशेष:- फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाइन सप्ताह सुरू असल्याने युवा, तरुण, तरुणी पासून तर वृद्ध जोडपे त्यामध्ये सध्या मश्गुल आहे. व्हॅलेंटाईन वीक मधील सर्व डे आनंदात साजरे करण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन वीक या वीकमधील रोझ डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे पार पडला असून आज ‘टेडी डे’ ची सर्वत्र धामधुम सुरु झाली आहे. या दिवसांचं आपलं म्हणून एक महत्त्व आहे. या दिवशी लोक एकमेकांना खासकरुन टेडी गिफ्ट करतात.
फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाइन सप्ताह युवा तरुण तरुणी पासून ते वृद्ध जोडपे पण आनंदात साजरा करतात. हा महिना प्रत्येक प्रियकरासाठी खास असतो कारण या महिन्यात प्रेमाचा हँगओव्हर इतर महिन्यांपेक्षा जास्त असतो. व्हॅलेंटाईन वीकमुळे हे घडते. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या प्रेम सप्ताहात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या चौथा दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारी ला “टेडी डे” मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. प्रेमाच्या आठवड्याच्या चौथा दिवशी, लोक आपल्या प्रियजनांना ‘टेडी’ भेट देतात. तसेच, या दिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले ऋणानुबंध अजून मजबूत करून नात्यात गोडवा निर्माण करू शकतात.
कारण ‘टेडी’ हा अनेकांचा आवडता बाहुला आहे. आणि या दिवशी हा टेडी आपल्या आवडणाऱ्या जिवलग व्यक्तीला दिला तर नात्यातील गोडवा अजून मधून होते. टेडीबिअर हा खासकरुन मुलींना तो फारच आवडतो. एखाद्या मुलीला टेडी भेट देणं म्हणजे तिचं अर्धे हृदय जिंकण्यासारखंच आहे. त्यामुळे तुम्हीही जिला इम्प्रेस करु इच्छिता तिला टेडी जरुर भेट द्या. सोबतच टेडी डेच्या सदिच्छा द्यायला विसरु नका.
तुमची गर्लफ्रेंड नसेल आणि एखादी मुलगी तुमची क्रश असेल तर तुम्ही तिला हटके शुभेच्छा देऊन इम्प्रेस करु शकता. कदाचित तुमचा हटके अंदाज पाहूनही ती तुमच्यावर इम्प्रेस होऊन तुमच्या प्रेमात पडू शकते.