युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 21 महिन्यानंतर नागपूरला येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. काटोल नरखेड, कळमेश्वर, उमरेड, कुही, मौदा, रामटेक आणि हिंगणा तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर नागपूर विमानतळावर परिसरात जमा झाले होते. त्यांच्या सिविल लाईन मधील बंगल्यावर जीपीओ चौकात ढोल ताशांच्या गजरात प्रचंड गर्दी आनंदी वातावरण स्वागत करण्यात आले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 21 महिन्यांनी आज पहिल्यांदाच नागपूर मध्ये परतले त्यांच्या स्वागतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जनसागर उसळला होता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकारी व नेत्यांनी देशमुख यांचे स्वागत केले माझे मंत्री अनिल देशमुख यांचे पत्नी आरती देशमुख यांच्यास आगमन झाले त्यांनी साई मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. मिरवणुकीचा समारोप जीपीएस चौकात करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या पत्नी आरती देशमुख व पुत्र युवा नेते सलील देशमुख कृषी देशमुख व इतर कुटुंबाने दिवाळी पेक्षा मोठा आनंद साजरा केला याप्रसंगी घरी मोठी आतेषबाजी करण्यात आली होती.
यावेळी क्रेंनच्या साह्याने मोठा हार टाकण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चतुर्वेदी, जिल्हा प्रमुख किशोर कुमार, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे करून बनकर, समाजवादी पार्टीचे मुस्लिम लिंक, महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांनी माजी मंत्री देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांनी सबोधन करताना संविधान चौक येथे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख सांगितले की मला खोट्या आरोप करून आता रोड तुरुंगात 14 महिने दाबून ठेवण्यात आले मला सूटबुडीने अटक करण्यात आली असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी सांगितले.