श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन बीड:- राजकीय नेत्यांचे अपघात होत असण्याच्या घटना वाढत असतानाच एका आमदाराच्या मामांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मणिक रायजादे असं मृत व्यक्तीचं नाव असून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.
मणिक रायजादे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा आहेत. ते, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास प्रवास करत होते. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गढी नजीक त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ब्रेजा कारने चार ते पाच वेळा पलट्या घेतल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रायजादे यांचा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून सिन्नरकडे पाठवण्यात आला आहे