✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धाः- पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी तयार केलेल्या क्राईम इंटेलजिन्स पथकाने वर्धा येथील कुख्यात सट्टा-पट्टी (जुगार) चालविणारा राजू उर्फ जितेन बालवे यांचेवर धडाकेबाज कारवाई केली आहे.
१०/०२/२०२३ रोजी पोलिस अधिक्षक वर्धा द्वारे तयार केलेल्या क्राईम इंटेलिजन्स पथकास मुखबीर कडून गोपनीय माहीती प्राप्त झाली कि, दयाल नगर, वर्धा येथील राहणारा राजु बालवे हा दयाल नगर परीसरात त्याचे ३ सहकाऱ्यांसोबत सट्टा-पट्टी जुगार चालवित आहे. अशी प्राप्त माहीती पोलिस अधीक्षक यांना दिली असता पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करण्याकरीता
आदेशीत केले. त्यावरुन क्राईम इंटेलिजन्स पथकाने यातील आरोपी राजु बालवे (रा. दयाल नगर, वर्धा) याच्या घरी छापा कारवाई केली.
यावेळी आरोपी हा त्याचे ३ सहकार्यासोबत त्याचे राहते घरी मोबाईल फोनवरुन व लोकांकडुन सट्टा-पट्टी घेत असल्याचे दिसून आले. आरोपींना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव
१) राजा उर्फ जितेन सुरेश बालवे, वय ४२ वर्ष,
२) पंकज सुरेश बालवे, वय ४० वर्ष, दोन्ही रा. वार्ड क्र. ३९,दयाल नगर, वर्धा, ३) अक्षय रमेश कोरे, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा, ४) स्वप्नील वसंत बोरकर, वय २८ वर्ष, रा. मास्टर कॉलनी, वर्धा असे सांगीतले. आरोपींना गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता यातील आरोपी क्र. १ राजा उर्फ जितेन बालवे हा यातील आरोपी क्र. २ ते ४ यांचेसह आर्थीक फायद्याकरीता सट्टा-पट्टी चालवित असल्याचे सांगीतले. यातील आरोपीची अंगझडती घेतली असता यातील आरोपी क्र. १) राजा उर्फ जितेन बालवे याचे ताब्यात १) नगदी ७२,०००/- रु.,२) एक सॅमसंग कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि २४,०००/-रु. आरोपी क्र. २) पंकज सुरेश बालवे याचे ताब्यात एक लोखंडी प्राणघातक धारदार चाकु कि. २००/-रु., २) नगदी २७,६६०/- रु., ३) एक ओप्पो कंपनीचा मोबाईल कि. १५,०००/- रु., यातील आरोपी क्र. ३) अक्षय रमेश कोरे याचे ताब्यात १) नगदी ९००० /- रु.,
व यातील आरोपी क्र. ४) स्वप्नील वसंता बोरकर याचे ताब्यात १ ) नगदी १९,४००/- रु., तसेच सट्टा-पट्टी चालविण्या करीता लागणारे साहित्य कि. ४०/-रु.असा एकुण जु. कि. १,६७,३००/-रु.चा मुद्देमाल मिळुन आल्याने कायदेशिर रित्या गुन्ह्यात जप्त करण्यात करुन यातील आरोपी क्र. १ ते ४ यांचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस स्टेशन वर्धा (शहर) करीत आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक संदिप कापडे नेमणूक क्राईम इंटेलजिन्स पथक तसेच सायबर सेल, वर्धा यांचे प्रत्यक्ष हजेरीत पोलिस अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के सर्व नेमणुक क्राईम इंटेलजिन्स पथक, वर्धा यांनी केली आहे.