नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- निर्णयाची धडाडी, विकासाची संगत, आतापासून आम्ही, शिंदे साहेबांसोबत, असा संकल्प करून ठाण्यातील लोकमान्यनगर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, यांच्यासह माजी नगरसेवक ठाकूर, नगरसेविका राधाबाई जाधवर, वनिता घोगरे तसेच दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच आपल्यावरील टिकेला किंमत देण्यापेक्षा टीकाकारांना आपल्या कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असून त्यानुसारच वैयक्तिक स्वार्थ न ठेवता विकासाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करित असल्याचे यासमयी बोलताना सांगितले. किसननगर विभागाचा क्लस्टर योजनेद्वारे पुनर्विकास करणे हे आपले स्वप्न असून त्यापाठोपाठ दुसरी क्लस्टर योजना लोकमान्य नगर येथे देखील राबविण्यात येईल अशी घोषणा यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केली.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर, ठाणे जिल्हा महिला सेना संघटक सौ.मीनाक्षी शिंदे आणि प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.