पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सध्या पुणे शहर हद्दीमध्ये कसबा विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणुक असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, मा. पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी युनिट-१ चे कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या अनुषंगाने गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे गुन्हेगार व हदपार केलेले गुन्हेगार यांना चेक करून तसेच अवैद्य अग्निशस्त्र विरोधी विशेष मोहिम राबवुन शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करणे बाबत आदेशित केल्याने व त्या नुसार मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १. पुणे शहर यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कसया मतदार संघाचे कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करि असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे बातमीदारकरवी बातमी मिळाली की, “एकबोटे कॉलनी शारदा हॉस्पीटलचे जवळ घोरपडे पेठ पुणे या ठिकाणी एक इसम उभा असून त्यांचेकडे पिस्टल हे हत्यार असून तो कोणतातरी गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे” अशी खात्रीशीर बातमी मिळालेने त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदिप भोसले गुन्हे शाखा युनिट १, पुणे यांना सांगितली त्यांनी ती वरिष्ठांना माहिती देवून सपोनि आशिष कवठेकर व स्टाफ यांना आदेशित केले त्याप्रमाणे सपोनि कवठेकर श्रीपोउपनि रमेश तापकीर, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, आण्णा माने असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी एकबोटे कॉलनी येथे जावुन सापळा लावुन दिनांक ०९/०२/२०२३ रोजी १९/३० वा. चे सुमारास मनमोहनपार्क सोसायटीचे गेटचे जवळ एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ पुणे येथे सार्वजनिक रोडवर इसम नामे अभिषेक दिपक हजारे यय २१ वर्षे रा. गल्ली नं. १०२. शिवसेना – कार्यालय जवळ जनता वसाहत पुणे यास ताब्यात घेवून त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता झडती मध्ये त्याचे पॅन्टमध्ये कंबरेस खावे बाजुस खोचलेले कि रु. ६१,०००/- एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुन आले. त्याची मॅगझीन काढून पाहता त्यामध्ये ०१ जिवंत काडतुसे मिळुन आले. या बाबत पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांनी तक्रार दिलेने नमुद इसमाविरुद्ध खडक पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक५९/२०२३ भारताचा हत्यार कायदा कलम ३ (२५) म.पो.का. ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास आशिष कवठेकर हे करत आहेत. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याने सदरचे गावठी पिस्टल हे दहशत करणे करिता वापरत असल्याचे सांगितले तसेच त्यास मा. न्यायालयात हजर करून त्याची तपासकामी दिनांक
१३/०२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिप भोसले, सपोनि आशिष कवठेकर, पोउपनि रमेश तापकीर, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, आण्णा माने, शुभम देसाई, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.