पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पूणे:- मा. पोलीस आयुक्त सो श्री रितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी, जबरी चोरी, दरोडा सारख्या गुन्हयांना आळा घालून पडत असलेले गुन्हें उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले.लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ११०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरी गेलेला ७,००,०००/- रु. किंमतीचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक याचा समांतर तपास करत असताना पोलीस शिपाई ८६६६ अमोल सरतापे व पोलीस शिपाई ८५७७ विनायक येवले असे दोघांनी मिळून आष्टापुर फाटा लोणीकंद येथुन से पाचोड गाँव, ता. पैठण जि. औरंगाबाद पर्यंत एकुण ३४२ ठिकाणचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करून हायवा ट्रक चोरी करणारा आरोपी नामे लक्ष्मण बाबुराव गाडे, वय ३८ वर्षे, रा. पाचोस गांव, ता. पैठाण जि. औरंगाबाद वास निष्पन्न करून त्यास गुन्ह्यात अटक केले असून, त्याचे मालकीचे शेतान ट्रकचे तुकडे करण्यासाठी लागणारे ( गॅस कटर व इतर साहित्य) तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हायवा ट्रकची नंबर प्लेट व डिसेंबर महिन्यात दाखल असलेला गुन्हा रजि. नं. ७१७/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेला हायवा ट्रकची नंबर प्लेट पंचनाम्याने जप्त केली असुन सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले असुन सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यास सदर गुन्ह्यात मदत करणारे साथीदार आरोपी नामे १) फिरोज मकबुल शेख, वय २६ वर्षे, व्यवसाय भंगार दुकान रा. शहागढ़ गांव वा आंबड जि. जालना २) महाजन दगडुसिंग सुंदडे, वय ४६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. भोकरवाडी, ता. अंबड जि. जालना यांचे मदतीने वर नमुद चोरीस गेलेला हायवा ट्रकचे तुकडे तुकडे करुन, स्क्रॅप केला असलेबाबत चौकशीत निष्पन्न झाल्याने वर नमुद आरोपीपैकी क्रमांक १ यास त्याचे राहते घरुन अटक करून आरोपी क्रमांक २ यास शिवाजीनगर कोट पुणे आवारा बाहेरुन अटक केली असुन वरील सर्व आरोपींकडुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला हायवा ट्रकचे तुकडे तुकडे करुन स्क्रॅप केलेला सर्व मुद्देमाल शहागड ता. अंबड जि. जालना येथून पंचनाम्याने ताब्यात घेतलेला असुन सदर गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपी निष्पन्न केले असुन, त्यंची नावे १) शाहरुख मकबुल शेख २) नफीम मन्सुर सय्यद ३) अस्लम आबिदीन सय्यद, ४) सुर्यवंशी (पुर्ण नाव व व पत्ता माहित नाही) ६) जीतु शर्मा, ७) रजीउद्दीन सय्यद अशी त्यांची नावे असून,त्यांचा शोध घेत आहोत.यातील मुख्य आरोपी नामे लक्ष्मण बाबुराव गाडे याचेवर वाहनचोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुमार मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाडवी व पोलीस अंमलदार, अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे यांनी केली आहे.