✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे महाराष्ट्र सुती मिल कामगार संघटनेची स्थापना दि.१३ फेब्रुवारीला कामगार नेते, हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अँड. सुधीर कोठारी, माजी आमदार गजुभाऊ तिमांडे व आफताब खान यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक कामगार नेते व हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड. सुधीरबाबु कोठारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, संघटनेचे अध्यक्ष आफताब भाई खान, यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन केले. कामगारांनी आपली एकजूट अभेद्य ठेवली तर कोणतीही शक्ती भविष्यात कामगारांवर अन्याय करू शकणार नाही हे ठामपणे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, बाबाराव पांगुळ, नितेश नवरखेडे, सुरेंद्र टेंभुर्णे उपस्थित होते. यावेळी उपस्थित संघटनेचे उपाध्यक्ष आशिष हरबुडे,सचिव नितीन कांबळे, सहसचिव संजय भोयर, कोषाध्यक्ष दत्तात्रय कुरसुजे, कार्याध्यक्ष सचिन शेंडे, बंडु काटवले, दिगांबर नवघरे, संतोष माथनकर, विनोद गोटे, गजानन चामचोर, गजानन गोटे, सुनिल उमक, महेंद्र चहाणकर,संजय भेदुरकर, संदेश खोडे, नितीन विरुळकर, चंद्रकांत गुरनुले,संजय मुन, ज्ञानेश्वर जुमनाके, अरविंद मडावी, अरुण शंभरकर, प्रमोद ठाकरे, योगेश टेंभुरकर, लाला लालसके, अल्पेश बरेघ, मनोज कावळे, करण पोकळे, पवन ठोंबरे, प्रशांत सांबरे, शालिक गायकवाड, निवृत्ती परचाके, विनोद कुटे, धनराज साळुंखे, विनोद उताने व मोठ्या प्रमाणात कामगार व महिला कामगार भगिनी उपस्थित होत्या.