तिघांचा बळी जाऊनही कळमेश्वर गोवरी पुल बनता बनेना.
पावसाळ्यात साहा गावांच्या संपर्काचं काय?
विघार्थ्यांचे शैक्षणिक तर शेतकर्यांचे प्रचंड हाल,
कंञादाराने काम बंद करुन गाशा गुंडाळला
लोकप्रतीनिधींची उदासीनता माञ कायमचं.
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर गोवरी नदीवरचा पूल हा ग्रामीण भागाला नागपुरला जोडणारा महत्त्वपूर्ण दुआ आहे. पण आज हा पूल अपूर्ण असल्या मुळे नागरिकांना अनेक समस्याला समोर जाव लागत आहे. या पुलामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले असूनही प्रशासन झोपेचे सोग घेऊन बघत आहे.
तीघांचा बळी जाऊनही कळमेश्वर – गोवरी नदीवरचा पूल जवळपास गेल्या दोन वर्षांपासून बनता बनेना. मागील महिन्यात कंञाटदाराने अर्ध्यातच काम बंद करुन गाशा गुंडाळत पोबारा केल्याने हा पुल पुर्णत्वाला जाणार कां? ग्रामिण नागरिकांचा दळनवळनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाच लोकप्रतिनीधी मात्र या समस्येप्रती म्रुग गीळून सपशेल दूर्लक्षीत आहेत. या पुलावरुन कळमेश्वर सह खैरी, गोवरी, तीष्ठी, पारडी, तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी आदि सात गावखेड्यांसाठी थेट वाहतूक होत असल्याने या मार्गावरिल हा पुल दूवा आहे. शेकडो शालेय विघार्थी विघार्थीनी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या वाहतूकीचा जिव्हाळ्याचा विषय असताना सार्वजनिक बाधकाम विभाग माञ धूतराष्ट्राची भुमिका निभावत आहे. पुलाच्या बांधकामाकरिता तात्पुरता बांधन्यात आलेला पाच पायल्या टाकलेला पुल व रस्ता पावसाळ्यात आलेल्या पुराने वाहून गेल्याने नागरिकांच्या दळनवळनाचा गंभीर प्रश्न ईथे निर्माण झाला आहे.
दोन वर्षा आधी गोवरी येथील दोन नागरिकांचा बळी गेल्याने प्रशासनाला जाग आली.
कळमेश्वरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा पुल आहे.आधी रपटा व लाहान अरुंद पुल असल्याने अपघाताच्या वारंवार श्रुंखला घडायच्या.जानेवारी २०२१ मध्ये २ कोटी ९५ लक्ष रुपयांचा निधी आर्च पुल बांधकामासाठी शासनाकडूण प्राप्त झाला. श्री साई बालाजी कंन्ट्रकशन कंपनी नागपुर यांना या पुलाचे मुदतपुर्व बांधकाम करन्याचा कंञाट देण्यात आला.जानेवारी २०२१ ते फरवरी २०२२ पर्यंत या पुलाचे बांधकाम पुर्ण करन्याचा १२ महिन्यांचा कालावधी होता. मोठ्या थाटात लोकप्रतीनिधीं कडूण भुमिपुजनही पार पडले. प्रशासकिय मान्यताही मिळाल्या. युद्धपातळीवर कामाची सुरुवात होईल व मुदतपुर्व बांधकामही होईल अशी आशा नागरिकांना होती. माञ सूरवाती पासूनच कामाची गती प्रचंड थंडावलेली होती. आजघडीला पुल बांधकामाची मुदत संपुनही केवळ तीस टक्के काम झाले. सदरील पुलाचे पावसाळ्यापुर्वी पासून काम कायमचे बंदच झाले. पुन्हा चार महिन्यांनी पावसाळ्याला सूरुवात होणार आहे. या मध्यतरीच्या काळात या पुलाचे काम पुर्ण होने अपेक्षीत असताना स्थानिय लोकप्रतीनीधींकडूण शासन स्तरावर पाठपुरावा होने गरजेचे आहे.
यात ” माशी शिंकली ती माञ स्ट्रक्चर आर्चची” आधीच स्ट्रक्चर प्रोजेक्ट आर्च नं बनविता प्रत्यक्ष कामाला सूरुवात केल्या गेली. संपुर्न महाराष्ट्रातील पुलांचे स्ट्रक्चर आर्ट बनविनार्या नागपुर येथील माॅडर्न आर्टला या पुलाचे स्ट्रक्चर आर्च बनविन्या बाबत कंञाट दिला. त्यांच्याकडूण आजवर तो मिळता मिळेना झाल्याने यातुन कंटाळलेल्या कंञाटदाराने सदर पुलाचे काम बंद करुन आपला गाशा गुंडाळून पळ काढल्याची माहीती समोर आली आहे. सध्यास्थीतीत या पुल बांधकामावर सुमारे ८० लाखांच्यावर खर्च झालेला आहे. यात पुन्हाहून शासनाचे मोठ्या प्रमानात आर्थीक नुकसान होनार हे निश्चीत झाले आहे. “पुन्हाहून नव्याने प्रक्रिया होनार असल्याची विश्वसनिय माहीती आहे.
काम बंद केल्याने सबंधीत कंञाटदारांवर दंड आकारन्याची प्रक्रीया सूरु असून,शासनस्तरावर स्ट्रक्चर आर्च बाबत कार्यवाही केली जात आहे. शासनाचे आर्थीक नुकसान होनार नाही याची काळजी घेतल्या जात असून नव्याने निविदा काढून उर्वरित बांधकाम प्रक्रिया रेगुलर कनवर्ट करुन लवकरात लवकर पुर्न करनार. रुपेश बोधडे, अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग कळमेश्वर.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348