✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट/वर्धा:- जील्हातील हिंगणघाट शहरात भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरभरात झालेली विकास कामे गुणवत्ता हीन आहे. त्यामुळे दि. 17 फेब्रुवारी ला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास शहरात मोठा अपघात झाला. एक मालाने भरलेला ट्रक जमिनीच्या आत अर्धा गाडला गेला त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात एकच खळबळ उडाली.
भुयारी गटार योजनेमध्ये शहरातील बहुतांशी भागातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेंबरही बांधले आहेत. रस्ते खोदून ते व्यवस्थित न बुजविल्याने त्याचा त्रास शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, अनेक मालवाहक ट्रक, ट्रॅक्टर जमिनीत धसल्या जात आहे. यावरून असे सिद्ध होते की, या योजनेत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला.
हिंगणघाट येथून एक मालवाहतूक करणारा ट्रक माल घेऊन नागपुर येथे जात होता. ड्रायवरला भूक लागली म्हणून त्याने स्थानिक विठोबा चौक परिसरातील जनता हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला उभा केल्यानंतर तो जेवण करायला गेला 9:30 वाजताच्या दरम्यान उभा असलेला ट्रक भष्ट्राचाराने बरबटलेल्या रस्त्यावर भुयारी गटार योजनेत जमिनीत अर्धा गाडला गेला. त्यामुळे त्या स्थिकानी स्थानिक नागरिकांनी बघायला एकच गर्दी केली. ट्रकची मागील चाके जमिनीत गेल्याने खड्ड्यात ट्रक अडकून पडला होता. ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेंनची मदत घावी लागली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348