भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम व माजी जि.प.सदस्या अनिताताई आत्राम याच्या हस्ते महाप्रसाद वाटप.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- वांगेपल्ली नदिघाटावर महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर भाविक मोठ्यासंख्येने पवित्र स्नान करून शंकरजी चे दर्शन घ्यायला येत असतात. म्हणून महाशिवरात्री चे औचित साधून भाविक भक्ताकरिता भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचे सेवन करून दिपक दादा आत्राम यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी वांगेपल्ली सरपंच दिलीप मडावी, पृथ्वीराज आत्राम, माजी सरपंच दिलीप गंजीवार, जुलेख शेख, संदीप बडगे, रमेश दडीगेला, महेश सडमेक, संदिप मडावी, संदीप गेडाम, सुधीर मडावी, नागाजुन येलमुले, मिलिंद अलोने, जावेद अली, सुधाकर कोरेत, मुनेश आत्राम, सुनंदा बाई आत्राम, सिद्धार्थ तलांडे, विनोद कावेरी सह आदिवासी विद्यार्थी संघ व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348