रूम मध्ये मिळून आली अनेक पॉकीट मधून लाखोंची रक्कम.
✒️मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी यांला गुरुवारी रात्री वर्धेच्या शासकीय विश्रामगृहात स्वस्त धान्य व्यावसायिकाकडून वीस हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. विजय कृष्ण सहारे जिल्हा पुरवठा अधिकारी असे या लाचेचा भास्म्या रोग जळलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचेचा भस्म्या रोग जळलेल्या वर्ध्या जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्ण सहारे हे शासकीय विश्रामगृहात एका खोलीत मुक्कामानी राहायचे. याच दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील स्वस्त धान्य व्यावसायिकाकडून महिन्याकाठी लाखोंची माया गोळा करायचा. या अवैध लाचखोरीतून त्याने मोठ्या प्रमाणात अवैध माया जमवली अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार देवळी येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे दोन स्वस्त धान्य दुकानातील नियमित हप्ता देण्याचा तगादा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्ण सहारे यांनी लावला होता. सात महिन्याच्या कमिशेन 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तर पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदाराना मिळणाऱ्या कायदेशीर कमिशन मधून पैश्याची मागणी केली. दरम्यान तडजोडी अंती स्वस्त धान्य दुकानदाराने 40 हजार रुपये देण्यास सहमती दिली. त्यानंतर रात्री वर्धा शहरातील शासकीय विश्रामगृहात पहिला हप्ता 20 हजार रुपयांची रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. विजय सहारे याच्या सोबत असलेला खासगी सहकारी ऋषिकेश ढोडरे याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या खोलीची पाहणी केली असता वेगवेळ्या लिफाफ्यात पाच लाख 60 हजार 360 रुपये मिळून आले.यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी मद्यस्थिच्या माध्यमातून याठिकाणी लाचखोरी उकळण्याचा धंदा उघडल्याचे दिसून आले.रात्रीला लाखोंची माया गुंडाळणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याला मात्र अखेर लाचखोरीत अटक व्हावे लागले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिरझापुरे,पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, करुणा सहारे, विकास गंडेवार यांनी केली.
विजय सहारे हे वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी रुजू झाल्यापासून ते विश्रामगृहातील रूम मध्ये राहत असायचे.गुरुवारी लाचलुचपत विभागाने रूममध्ये धाड टाकली यावेळी 20 हजार लाच स्वीकारली.त्यानंतर रूमची तपासणी दरम्यान त्याठिकाणी पाच लाख 60 हजार 360 रुपये वेगवेगळ्या पॉकेट मध्ये आढळून आले. एकाच दिवशी एवढी रक्कम या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्वस्त धान्य व्यावसायिकां कडून एवढी रक्कम उकळली जात असेल तर यात भ्रष्टाचार केला जात तर नाही ना? एवढी रक्कम देणारा कोण? रक्कम देणाऱ्यांची चौकशी केली जाणार की या प्रकरणावर पडदा पडणार?
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348