✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दिनांक 18 फेब्रुवारी:- हिंगणघाट तालुक्यातील किन्नाडा गावा मध्ये युवा संभाजी फाऊंडेशन च्या वतीने शिवजयतीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमचे उदघाटक म्हणून डाॅ. उमेश वावरे (वैज्ञानिक) यानच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यानच्या मुर्ती सामोर दिपप्रज्वलीत करून उदघाटन करनात आले व स्त्रीरोग तज्ञ सौ. मीनाक्षी उमेश वावरे उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट यानच्या अध्यक्षते खाली आरोग्य तपासणी शिबिर सुरवात करण्यात आली. यावेळी डाॅ. संदिप भोमले, डाॅ. खेडकर मॅडम आरोग्य पि एसी नंदोरी मेघा सोनुरले व आशा सेवीका संघमित्रा पाझारे यानी शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य केले.
यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणीच्या लाभ घेतला. व सर्व मान्यवरांचे शाल श्रिफळ व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी मनीष कांबळे, संरपच ऊत्तम बावणे, युवा संभाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणय पाटील, नुतन राठोड, राकेश बोबडे, दिलीप वाढई, मंगेश पाटील, दिनेश शेंन्डे, मिथुन बावणे, हर्षल बारई, आशिष बैसमारे, प्रणय बावणे, समिर गाढवे, रूपेश कामडी, अमोल पाझारे व समस्त गावकरी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348