अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- स्थानिक जय शिवाजी सामाजिक संस्था, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड द्वारा पांढुर्णा वळण मार्गावरील छत्रपती शिवाजी चैक येथे दि.18, 19, 20, 21 फेब्रुवारी रोजी भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 18 रोजी शिवतीर्थ उमरी ते शिवाजी चैक येथे शिवज्योत रॅली काढून चैकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ स्थापना करण्यात येणार आहे. दि.19 फेब्रुवारी रोजी ढोल ताश्यांच्या गजरात माजी मंत्री मा. आमदार सुनील केदार, व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून मानवंदना देण्यात येईल यावेळी अनिल भुसारी प्रवक्ते मराठा सेवा संघ, यांचे जाहीर भाषण होणार आहे. या दरम्यान स्वागत सत्कार कार्यक्र, सायंकाळी 6 वा. राष्ट्रीय किर्तनकार विधे गुरूजी महाराज यांचे किर्तन होणार आहे. दि. 20 रोजी दुपारी 12 पासून लेझीमसह विविध स्पर्धा, दु. 3 वा. 12 वी नंतर पुढे काय ? याविषयावर मार्गदर्शन, सायं. 6 वा. कराटे त्वायकांडो प्रात्याक्षिक दि. 21 रोजी मॅराथॅन धाव स्पर्धा, दुपारी 2 वा. श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण, सायंकाळी 7ः30 वा. नाटय व गायन स्पर्धा तसेच बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. करीता कार्यक्रमास ऊपस्थित रहाण्याची विनंती दिनेश इंगोले (अध्यक्ष-जयशिवाजी सामाजिक संस्था, जिल्हाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड), प्रशांत ठाकरे (उपाध्यक्ष), गजेन्द्र कोमुजवार (सचिव) रमेश वानखेडे, पुरुषोत्तम काळे,मनिष घोडे, विक्रम गमे,नरेन्द्र पारवे, शकिल झेडीया, प्रशांत दोरखंडे पांडुरंग भोंगाडे, यांनी केली आहे.