✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वराज्याचे निर्माचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सिद्धार्थ नगर, हिंगणघाटच्या वतीने ज्ञानाचे घर म्हणून ओळख असलेल्या द सिम्बॉल ऑफ नोलेज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, सिद्धार्थ नगर,हिंगणघाट या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्हासाने गगन भेदी गर्जनेत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने सिद्धार्थ नगरचे जेष्ठ नागरिक बंडुजी मानकर, छ.शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने राजेश धोटे, संभाजी ब्रिगेड हिंगणघाटचे सचिनभाऊ पोटदुखे, सावित्रीबाईच्या लेकी व रमाई मंचच्या सिमाताई मेश्राम व जयश्रीताई बांबोळे, समता सैनिक दलचे मार्शल रत्नकेतु दुर्गे, बौद्ध पंच कमेटीचे सह कोषाध्यक्षा आयु.ज्योतीताई मानकर, वाचनालय संचालक मंडळच्या अध्यक्षा आयु.साधनाताई दहिवडे, उपाध्यक्षा आयु.मनिषाताई तावाडे तसेच सिद्धार्थ नगरचे व संभाजी ब्रिगेडचे सर्व जेष्ठ नागरिक पदाधिकारी सदस्य सदस्या विद्यार्थी बा्ल मित्र या सर्वांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनसाठी सिद्धार्थ नगर तर्फे अल्पोहारची व्यवस्था करण्यात आली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348