नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- महानगरपालिका हद्दीतील नळपाडा, सुभाषनगर परिसरातील जनतेला अद्ययावत व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल व उद्यानाची सुविधा मिळावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला पुढाकार.. यासाठी लागणारा निधी शासनातर्फे अन्यथा आमदार निधीतून देण्याचे आश्वासन दिले
ठाणे महानगरपालिका हद्दीतील नळपाडा, सुभाषनगर परिसरामध्ये अनेक दिवसांपासून नागरी सुविधा देण्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे स्थानिक नागरिकांकडून मागणी होत होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकारी व स्थानिक रहिवाश्यांना बरोबर घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली असता निळकंठ पाम या विकासकाच्या सुविधा भुखंडावर बांधण्यात आलेल्या मल्टीपर्पज इमारतीमध्ये पहिल्या व दुसर्या मजल्यावर या परिसरातील गरीब जनतेसाठी बँक्वेट हॉल त्याचबरोबर तळमजल्यावर या परिसरातील तरूणांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा तसेच शेजारील असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या राखीव भुखंडावर इंग्रजी माध्यमाची शाळा व निळकंठ पामच्या विकासकाने दिलेल्या ३७०० चौ.मी.च्या भुखंडावर अद्ययावत उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
महानगरपालिकेच्या आरक्षित असलेल्या भुखंडावर होत असलेले अतिक्रमण काढून सदरचा भुखंडाला कुंपन भिंत घालून महानगर पालिकेने जागा ताब्यात ठेवावी व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती ताबडतोब करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त हिरवडे यांनी महानगरपालिकेच्या अधिकार्यांना दिले.
याचबरोबर यासाठी जो निधी लागेल तो महानगर पालिकेकडून, शासनातर्फे अन्यथा आमदार निधीतून देण्याचे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्याने नळपाडा, सुभाषनगर या परिसरातील जनतेला अद्ययावत व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल, शाळा व उद्यानाची निर्मिती आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने होत असल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

