पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असता दोन टोळ्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.24) घडली असून या प्रकरणी एकाला शस्त्रासह
ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे ससून हॉस्पिटल मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात खळबळ उडाली आहे..
हडपसर येथील शिकलकरी यांच्या दोन गाटात हाणामारी झाली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीं आरोग्य तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी दुसऱ्या टोळीने समोरच्या टोळीवर हल्ला केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये काही महिला एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. तर काही तरुण हातात कोयता घेऊन एकावर वार करताना दिसत आहेत.
या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले..