मंगेश जगताप, मुंबई (विक्रोळी) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उल्हासनगर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून अनेक परिवार उघड्यावर आले आहे. अनेक परिवारात हत्या झाल्याचे अनेक घटनेवरून समोर येत असते अशीच एक घटना परत समोर आली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना उल्हासनगरात शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी ला घडली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.
उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात रोहित गांगुर्डे आणि अमित गांगुर्डे हे दोघे भाऊ राहत असून ते रिक्षाचालवण्याचे काम करतात. रोहित याचे अमितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अमितला होता. या संशयातून अमितने रोहितच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली.
हत्या झाल्याची माहिती उल्हासनगर पोलिसाना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी संशयित आरोपी अमित याला अटक करण्यात आली असून पुढील तपास उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात येत आहे.