प्रशांत जगताप, मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने दि. 24 फेब्रुवारी ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवजयंती निमित्य शिव जयंती महोत्सव 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यानाच्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात रुग्णमित्र म्हणून संपूर्ण विदर्भात ज्याचे नाव आदराने घेतले जाते असे गजुभाऊ कुबडे यांना सन्मानित करण्यात आले.
माणसाची ओळख ही त्याच्या श्रीमंतीवर नसते तर समाजातील तळागाळातल्या जनतेसाठी तो चंदना प्रमाणे किती झिजतो यावर ठरत असते.आणि मगच त्या चंदनाच्या सुगंधा प्रमाणे त्याचा सुगन्ध वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र दरवळतो आणि मग या सुगंधाच्या प्रेमात पडलेले वेडे मुशाफिर असा सारा आसमंत आपल्या कर्तृत्वाने सुगंधित करणाऱ्या साठी काहीही करायला तयार होतात. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलेला एक रुग्णसेवेच्या ध्यासाने पछाडलेला अवलिया गजुभाऊ कुबडे !
गजुभाऊंची मागील अनेक वर्षांपासून रंजल्या-गांजल्या जनांसाठी निःस्वार्थ भावाने सुरू असलेली रुग्णसेवा बघून त्यांना शिवजयंती निमित्य शिव जयंती महोत्सव 2023 या कार्यक्रमात जाहीर सन्मान करून त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर लोकांना मिळावी. यावेळी शहरातील गणमान्य व्यक्ती आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348