✒️प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्तीसगड:- येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुकमा जिल्ह्यातील कुंदेडजवळ माओवाद्यांनी केलेल्या भाड हल्ल्यात सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील कुंदेडजवळ सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. आश्रम पारा जगरगुंडा येथे माओवाद्यांनी गोळीबार करत हल्ला करण्यात आला.
सुरक्षा दलाचे पोलीस जवान कुंदेडजवळ जंगलात ऑपरेशनसाठी निघाले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. बेछुट गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
या चकमकीत 3 जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे एएसआय रामुराम नाग, असिस्टंट कॉन्स्टेबल कुंजम जोगा, शिपाई वंजम भीमा अशी सांगण्यात येत आहे. दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून सहाशे मीटर अंतरावर छत्तीसगडच्या राजनांदगांव जिल्हयाच्या हद्दीत माओवाद्यानी नाकाबंदीत असलेल्या दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार केले.
घटनास्थळ बोरतलाब ता.पु. जि. राजनाडगाव, छत्तीसगडच्या नाक्यावर हल्ल्यात CG पोलिसांचे 02 पोलीस जवान शहीद झाले. राजेश सिंग (हेड कॉन्स्टेबल), ललित यादव (कॉन्स्टेबल) अशी शहीद झालेल्या जवानांची नाव आहे. जवानांची हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी त्याच्या मोटरसायकलीही जाळल्या होत्या.