Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

ठाणे: ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव विनावापर पडून, प्रशासनाच्या गलथान कारभारावर आ. केळकर संतप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 27, 2023
in क्रीडा, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाणे: ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव विनावापर पडून, प्रशासनाच्या गलथान कारभारावर आ. केळकर संतप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- बाळकूम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही एक वर्ष विनावापर पडून असल्याची बाब उघडकीस आली आहे. आमदार संजय केळकर यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून प्रशासनाला फैलावर घेतले.

एप्रिलपासून शाळांना सुट्टी पडणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी मैदाने, जलतरण तलाव सज्ज ठेवणे गरजेचे असताना बाळकुम येथील २७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव अद्याप विनावापर पडून असल्याचे उघडकीस आले आहे. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत एप्रिलआधीच तलाव जलतरणपटू, सर्वसामान्य नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याची मागणी केली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी रोहित गुप्ते, बांधकाम विभागाचे अधिकारी आनंद नांदगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी २७ फेब्रुवारीला या तलावाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत हा तलाव वापरात नसल्याने ठाणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी होत असल्याबाबत श्री.केळकर यांनी संताप व्यक्त केला. या तलावात पुढील टप्प्याची काही कामे शिल्लक असून आठ कोटींच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे झाल्यानंतरच हा तलाव खुला करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मग लोकार्पणाची घाई का केली? :- जर कामे पूर्ण झाली नाहीत तर तलावाचे लोकार्पण करण्याची घाई का केली? एप्रिलपासून शाळेला सुट्ट्या पडणार असताना आता निविदा काढल्यास तलाव आणखी काही महिने रखडणार आहे. यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि गलथान कारभार दिसत असून ठाणेकरांच्या पैशाची ही उधळपट्टी असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला. एप्रिलआधीच कामे पूर्ण करून तलाव खुला करण्यात यावा, असा सज्जड दमच श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी भरला.

बाळकुम येथील राम मारुती नगर रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असून माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात स्थानिक समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. बाळकुम नाका ते माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयापर्यंत काँक्रीट रस्ता आणि बाळकुम पाडा नंबर ३ भूमिगत गटार आणि रस्त्याच्या कामाचीही श्री. केळकर यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांसमवेत भाजपचे रविराज रेड्डी, हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, तृप्ती सुर्वे, दत्ता घाडगे रुनवाल सोसायटीचे पंकज कारंडे, सचिन शिंगारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भयानक: या सुंदर दिसणाऱ्या महिलेने आधी सासूचे केले धारधार हत्याराने तीन तुकडे, मग पतीला ही पाच तुकडे करून जिवंत कापल.

Next Post

वैभव कान्वेंट स्कूल बल्लारपूर में दसवीं के विद्यार्थियों का बिदाई समारोह संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वैभव कान्वेंट स्कूल बल्लारपूर में दसवीं के विद्यार्थियों का बिदाई समारोह संपन्न.

वैभव कान्वेंट स्कूल बल्लारपूर में दसवीं के विद्यार्थियों का बिदाई समारोह संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In