✒️उषा कांबले, सांगली शहर प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- येथील हुपरी या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शाहुनगर हुपरी येथे युवा बौध्द धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य यांच्या वतीने संविधान संवाद प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या संविधान संवाद प्रशिक्षण शिबिरात युवा बौध्द धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य संतोष भोसले राज्य संघटक यांनी यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष व गुडे ग्रामपंचायत सदस्य पै. अविनाश भाऊ कांबळे यांचा प्रशस्तीपत्र व संविधान ग्रेट भेट हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.