पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयांकडून पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे अभिलेखांवर पाहिजे व फरारी असलेले आरोपींची संख्या जास्त असून त्यांचा शोध घेवून त्यांचेवर अटकेची कारवाई होणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केलेले होते. त्यानुसार पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ यांचे अधिपत्याखालील वेगवेगळया पोलीस स्टेशनकडील वरील कामगिरी करणारे निवडक व माहीतगार अंमलदार यांचे नेमणूक करुन परिमंडळीय ५ यांचे पाहिजे व फरारी असलेले आरोपींचे शोध पथक तयार करणेत आलेले आहे..
कोंढवा पोलीस स्टेशनचे टॉप १० मधील अभिलेखावर मागील ०१ वर्षाचे कालावधी पासून पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे आरिफ मदार मुजावर रा इनाम मस्जिद जवळ, ताडीवाला रोड, पुणे हा वारंवार वेषांतर करुन व वास्तव्याची ठिकाणे बदलत असलेने मागील ०१ वर्षात त्याचा शोध घेणे अत्यंत अवघड झालेले होते. परंतु त्याचेबाबत परिमंडळीय ५ चे पाहिजे व फरारी असलेले आरोपींचे शोध पथकांतील अंमलदार जयदेव भोसले व नासेर देशमुख यांनी संयुक्तिकरित्या मिळालेले माहितीचे आधारे त्यांस दि.२५/०२/२०२३ रोजी ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी कोंढवा पोलीस स्टेशनचे स्वाधीन केलेले आहे. नमूद आरोपी हा कोंढवा पो.स्टे. कडील गु. रजि. नं. २५० / २०२२ भा.द.वि.क ३९७.३९४.३८६ व इतर गंभीर गुन्हयांत पाहिजे व फरारी आरोपी मागील ०१ वर्षापासून पाहिजे होता.
सदरची कारवाई ही मा. श्री. रितेशकुमार सो. पोलीस शहर, मा. श्री. संदिप कर्णिक साो. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो. अप्पर आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त सो.. परिमंडळ ०५ पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली परिमंडळीय ५ चे पाहिजे व फरारी आरोपी शोध पथकाचे अंमलदार राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले यांनी केली आहे.