प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रुग्णसेवक सूरज कुबडे मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने दि २६ फेब्रुवारीला आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अतुल जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव जाधव, वासुदेव रामगुंडे, श्री माकोडे, अजय लढी, अजय ठाकरे, मनोज जिकार, नन्नूरे सर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रुग्णमित्र गजू कुबडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडिया ची सुरुवात झाली आहे. आभा हेल्थ कार्ड हे आयुष्यमान भारत या डिजिटल योजनेचा एक भाग असून यातून या कार्डच्या मदतीने देश भरातील सर्व रुग्णालयातून उपचार घेण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या योजनेतून सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा कार्ड बनवीत आहे. या हेल्थ कार्ड मध्ये आधार कार्ड प्रमाणेच रुग्णाला 14 आकडी नंबर मिळेल. या कार्ड मध्ये रुग्णाच्या संपूर्ण आजाराची माहिती नोंदविली जाईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहु शकतात. म्हणजेच या कार्ड मुळे कोणत्याही रुग्णाचा वैधकीय इतिहास सहज शोधता येणार आहे.त्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी यावेळी बोलतांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुग्णसेवक सूरज कुबडे यांनी केले. रुग्णसेवक सूरज कुबडे मित्रपरिवार यांनी या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सर्वात प्रथम शहरामध्ये या शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात जवळपास शेकडो नागरिकांनी आपली नोदणी आभा कार्डसाठी केली.संचालन अमोल वाघमारे यांनी केले.आभार अमोल रामगुंडे यांनी मानले.यावेळी आशा वर्कर शीतल झलके,सौ प्रिया मून, ज्योती चंदनखेडे, सचिन चचाने, सचिन करामोरे,पवन वाघमारे, धीरज नंदरे, प्रवीण चरडे,सतीश गलांडे, अमित गोजे यांनी परिश्रम घेतले.