पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :– मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेशकुमार सो यांनी तसेच मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णीक सो. इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आयुक्तालयातील वैद्यांवर प्रभावी कारवाया करून अवैधांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे सुचनेप्रमाणे तसेच मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मार्गदर्शना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधिकारी व अंमलदार यांची गस्त नेमली होती.
होळकरवाडी परिसरामध्ये काही शेतकरी असली पदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने आफुचे झाडांची लागवड करीत असलेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणेस माहिती मिळत होती. त्यामाहितीप्रमाणे सदर भागातगस्त घालून पाळत ठेवली असता औताडेवाडीकडुन होळकर वाडीकडे जाणारा ओढयामधील चिमणी तलावाच्या शेजारी, पुर्वेस गव्हाच्या शेतात अफु या अमलीपदार्थांची विक्री करण्याचे उद्देशाने आफुचे झाडांची लागवड करण्यात आली असल्याची खात्रीशिर बातमी प्राप्त झाली.
त्यानुसार दि.०१/०३/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे परवानगीनेस नं. १८० दस नं. १८३ मौजे होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे या दोन शेतजमीनीवर दि. ०१/०३/२०२३ रोजी दुपारीछापा कारवाई केली. सदरछापा कारवाई दरम्यान लोणीकाळभोर पोलीसांनी एकुण ११,६०,०००/- रुपये किंमतीचे, य ११६ किलोग्रॅम वजनाचे १३७४ आफुचे झाडेस. नं. १८० प.स. नं. १८३ मौजे होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे या दोन शेतजमीनीतुन दोन सरकारी पंचासमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत. सदर प्रकरणी शेतजमीन मालक नामे १) राजारामदामोदर होळकर वय ५० वर्षे रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे २) बाळु किसनकटके वय ५० वर्षे धंदा शेती रा. स.नं. २३/३. पाटीलनगर, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांचेविरुध्द लोणी काळमोर पोलीस ठाणेसएन. डी. पि.एस. कायदा कलम ८(ब) १८ भा द विक. ३४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा नोंदवणेत आला आहे. सदर गुन्हयात वरिलनमुद दोन्ही शेतमालक यांना अटक करणेत आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री अमित गोरे हे करीत आहेत. अशाप्रकारची शेतामधील कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाणेस प्रथमच करणेत आलेली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो परिमळ मा. बजरंग देसाई हा पोलीस आयुक्त न हडपसर विभाग यांचे मार्गदशनाखाली मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो. मा.सुभाष काळे पोलीस निरीक्षक सी (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक श्री अमोल घोडके, पो. ना. ६५०३ साळुंके, पो. शि. ३२९, विर, पो.शि. ४७११ कुदळे, पो. शि. ८१०८ मानापुरे यांचे पथकाने केली आहे.