परीक्षेत कॉपी बहाद्दूराना मदत करणाऱ्या शाळेवर कारवाई करा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथे आज दहावीच्या परीक्षादरम्यान परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. आज मराठी भाषा विषयाचा पेपर होता. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर बाहेरून सर्रासपणे कॉप्या पुरवतानाचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजले असल्याची स्थिती दिसून येत आहे.
आज पासून राज्यात सर्वत्र 10 वी ची परीक्षा सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा टर्निंग पॉइंट असते, पण आज अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथे कॉपी बहाद्दरामुळे परीक्षेला गालबोट लागले आहे. याकडे कुणाचे लक्ष नसून शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभाग डोळ्याला पट्टी बांधून धुतराष्ट्र बनल्या सारखे दिसून येत आहे. त्यामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड सुरू आहे.
राजाराम (खां) येते एकूण गुरुदेव आश्रम शाळा कमलापूर येथील एकूण 35 विध्यार्थी पैकी 28 विध्यार्थी परीक्षेला बसले आहे. भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथील एकूण 30 पैकी 29 विध्यार्थी बसण्यात आले आहे. शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम येथील 36 पैकी 35 विध्यार्थी या परीक्षेला बसण्यात आले आहे. राजे धर्मराव आश्रम मन्ने राजाराम शाळेत एकूण विध्यार्थी संख्या 16 पैकी 09 विध्यार्थी उपस्थित आहेत. राजे धर्मराव हायस्कूल मन्नेराजाराम येथील 21 विध्यार्थी पैकी 09 विध्यार्थी बसण्यात आले आणि राजे भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येतील एकूण विध्यार्थी 43 पैकी 38 विध्यार्थी परीक्षेला बसण्यात आले आहे. बोर्ड परीक्षा केंद्र सुरु असून या परीक्षा केंद्रावर सर्रास पणे कॉपी सुरु आहे हे विशेष.
महत्वपूर्ण असलेल्या परीक्षेत कॉपी बहाद्दूराना कॉपी करण्यापासून शाळेने या विद्यार्थांना प्रतिबंध करायला पाहिजे. पण शाळा व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करून या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुले समर्थन तर नाही ना दिले. अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळावर कारवाई करा…
परीक्षेत कॉपी बहाद्दराना मदत करणाऱ्या शाळा आणि शिक्षकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या शाळा आणि शिक्षक अनेक प्रामाणिक विद्यार्थ्याचे नुकसान करत आहे. या शाळांना शिक्षण विभागाने ब्लॅक लिस्ट करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348