✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सध्या राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान रबविल्या जातं असून प्रशासनाने परीक्षा केंद्रावर 44 बैठे पथक तर सहा भरारी पथकची नियुक्ती केली आहे. बुधवारी रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाच्या परीक्षेदरम्यान विविध परीक्षाकेंद्रावर 11 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. या विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
12 वी बोर्ड परीक्षेच्या रसायनशास्त्र या विषयाचा पेपरसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये 55 केंद्रावर 16452 विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी 16385 हजर होते व 67 विद्यार्थी गैरहजर होते. अतिसंवेदनशील व संवेदनशील असे एकूण 44 परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते.
तसेच विभागीय मंडळांनी नियुक्त केलेले 6 भरारी पथके यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रास भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने मॉडेल हायस्कूल, आर्वी येथे भेट दिली असता २ विद्यार्थी पेपर सुरू असताना कॉपी करताना आढळून आले तर आदर्श हायस्कूल, आंजी येथील दुपारच्या सत्रात सुरू असणारा राज्यशास्त्रच्या पेपरला 2 कॉपीबहाद्दरला रंगेहाथ पकडले.
उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वर्धा यांच्या भरारी पथकांनी वायगाव (नि) येथे स्व. भैय्यासाहेब उरकांदे कनिष्ठ महाविद्यालय येथे भेट दिली असता तेथे 3 कॉपीबहाद्दरवर कारवाई केली. हिंगणघाट तालुक्यातील बुरकोणी येथील संत साईबाबा महाविद्यालय येथील 4 कॉपीबहाद्दरवर कारवाई केली. वर्धा जिल्हात एकूण बारावीच्या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348