प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक हिंगणघाट येथे शिवसेना (ठाकरे) गटातर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन तुळसकर भवन येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी शाखा हिंगणघाटच्या वतीने खासादर अरविंदजी सावंत यांचे हार्दिक स्वागत करून पुढील येणाऱ्या स्थानिक निवडणूका संदर्भात चर्चा करण्यात आली.
राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती ॲड. प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उभारण्यात आली आहे. या आघाडी मुळे राज्यात एक नवीन समीकरण राजकीय पटलावर दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत जोमाने कामाला लागा अशा सूचना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याना दिला असल्यामुळे ते कामाला लागले आहे.
या प्रसंगी कुणाल वासेकर जिल्हाउपाध्यक्ष, अशोक भाले तालुका अध्यक्ष अजय डांगरे, सिद्धार्थ जामणकर, मनोज सावंत, गजानन दारोंडे, नाझिम पठाण, रवींद्र नारायणे, विनोद भुते आत्मराम डोफे, धीरज भगत, विनोद गोडघाटे, सिद्धार्थ धनविज, अश्वीन कांबळे, सतीश लोणारे, राजेश मून, विशाल कुंभारे, सचिन सुटे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे शाखा हिंगणघाटचे पदाधिकारी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348