अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-03 मार्च 2023:- सावनेर येथून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. येथील तहसील कार्यालय हिंगणा येथील तलाठी कार्यालय डिगडोह येथील कोतवालला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ही घटना समोर येताच प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येऊन तक्रार नोंद केली की तक्रारदार यांच्या मालकीचा प्लॉट क्र.1 वंगरवाडी एकात्मता नगर येथे असून तक्रारदार यांनी त्या प्लॉटचा गाव नकाश्याची तलाठी कार्यालय डिगडोह ता. हिंगणा येथील कोतवाल चंद्रशेखर दिवाणजी पारधी राहणार निलडोह एमआयडीसी नागपूर यांचेकडे मागणी केली असता चंद्रशेखर पारधी तक्रारदारास गाव नकाशा देण्याच्या मोबदल्यात तक्रारदारास 5000 रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने उपपरोक्त आरोपी विरुद्ध सापळा कारवाईचे आयोजन केले असता दि.2 मार्च रोजी लाचलचुपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पथकाने कोतवाल चंद्रशेखर पारधी यांना तक्रारदार यांचे कडून लाच रुपये 5000 रुपये आय.सी.चौक हिंगणा रोड येथे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
नमूद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता लाच रकमेची मागणी करून स्वतःस्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, मधुकर गीते अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, पोलीस निरीक्षक प्रीती शेंडे, नापोशी सारंग बालपांडे, मनापोशी गीता चौधरी, करुणा सहारे, दिपाली भगत, चामपोशी हर्षलता भरडकर यांनी केलेली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348