संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे नर्सरी, युकेजी, एलकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फॅमिली फन डे’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांसह विविध खेळ, नृत्य यांचा आनंद घेतला.
यावेळी आयोजित ‘फॅमिली फन डे’ या कार्यक्रमात स्पाॅट द कलर, हूप बॅलन्सिंग, आप्टिकल रेस, डक रेस, म्युझिकल कोन अशा विविध खेळांचा समावेश होता. अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348