✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- एक खळबजनक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर माध्यमातून फसवून अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात अशीच एक घटना समोर आली आहे. आरोपी सांगलीचा, बलात्कार केला कोल्हापुरात आणि तक्रार दाखल झाली वर्धा जिल्ह्यातील समुद्र्पुर पोलीस स्टेशनमध्ये.
सोशल मीडियावर माध्यमातून झालेल्या ओळखीचा परिणाम शारीरिक अत्याचारावर बेतण्याचा दुर्दैवी प्रसंग एका महिलेवर ओढवला.
समुद्रपूर तालुक्यातील एका गावातल्या चाळीस वर्षीय महिलेची सांगली जिल्ह्यातील अक्षय रमेश पवार या तीस वर्षीय युवकाशी ओळख झाली. एका वॉट्सॲप समुहावर हे दोघे एकत्रित आले होते. २०२१ च्या ओळखीतून जवळीक व पुढे मधुर संबंध वाढले. युवक तिला तिच्या घरून कोल्हापूरला नेत वेळोवेळी जबरी अत्याचार करीत होता, अशी पीडितेने तक्रार केली. पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील पेडवठगाव ठाण्यात प्रथम तक्रार दिली होती. मात्र घटनास्थळ समुद्रपूर तालुक्यातील असल्याने गुन्ह्याची नोंद समुद्रपूर ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश काळे यांनी दिली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348