मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- मुंबई मधील एक मोठ्या रुग्णालयात लापहरवाई समोर आली आहे. येथील प्रसिध्द नायर रुग्णालयामध्ये काल मध्यरात्री एक दुर्घटना घडली आहे. यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमध्ये चार नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
शहरतील नायर रुग्णालयातील चौथा मजल्यावर यावेळी खळबळ मजली जेव्हा सलापच्या सिलिंगचे प्लास्टर पडायला सुरुवात झाली. तिथे उपस्थित असलेले नागरिकांना काही समजण्याच्या आत ते सलापचे प्लास्टर तुटून एकाचा नंतर एक चार नागरिकांवर पडले.
प्राप्त माहितीनुसार नायर रुग्णालयामध्ये सिलिंग प्लास्टर कोसळून 4 जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्या आला आहे. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली आहे.