✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा सुं बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट येथे महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय लक्षात घेऊन तीन दिवसीय विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष्या डॉ. उषाकिरण थुटे यांच्या अध्यक्षते खाली पार पडले.
डॉ. उषाकिरण थुटे त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करिता आपण तत्पर असले पाहिजे तसेच संस्थे कडून व महाविद्यालयाकडून सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहोत असे त्यांनी आश्वासन दिले. उद्घाटक सेवानिवृत प्राध्यापक शेषरावजी येरलेकर, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ बी एम राजुरकर, नॅक समन्वयक डॉ. एस आर विहिरकर, श्री राजेंद्रजी डागा व वसंतराव कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात स्व. कृष्णराव झोटिंग पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. राजुरकर तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.टी. झाडे, कला विभाग प्रमुख डॉ. आर डी निखाडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस जी बोंडे, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. बी आर अवचट आणि नॅक समन्वयक डॉ.
एस आर विहिरकर तर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. जी बी ठक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. बोढे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. व्ही.एस. बेले यांनी केले.
या कला महोत्सवात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या त्यात स्लो सायकल, लांब उडी, उंच उडी, कबड्डी, गोळा फेक, १०० मीटर दौड इत्यादी क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक स्पर्धेत वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,व पोष्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धेत गितगायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा तसेच समुह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. वादविवाद स्पर्धेत प्रथम विजेता किर्तेश साबळे, व्दितीय सनोवर कुरेशी, तृतीय अविनाश सातघरे, भाषण स्पर्धेत प्रथम विजेता किर्तेश साबळे, व्दितीय करण विटाळे, तृतीय पल्लवी सोनटक्के पोष्टर स्पर्धेत प्रथम विजेता अश्विनी डोंगरकर, व्दितीय किर्तेश साबळे, तृतीय साक्षी गिरडे रांगोळी स्पर्धेत प्रथम विजेता प्रतिभा वरूडकर, व्दितीय शितल ससाणे, तृतीय निलम मेश्राम गितगायन स्पर्धेत प्रथम विजेता जामेला
कुरेशी, व्दितीय पुर्वा बावणे, तृतीय आचल माडेश्वर एकल नृत्य स्पर्धेत प्रथम विजेता खुशी बावणे, व्दितीय मनोज मानकर, तृतीय कोमल सावज समुह नृत्य स्पर्धेत प्रथम विजेता अंवतिका दासरवार आणि गृप व्दितीय पुजा झाडे आणि गृप तृतीय संपदा बोकडे आणि गृप तसेच प्रोत्साहनपर पल्लवी सोनटक्के, शिवानी भोयर याप्रसंगी पदव्युत्तर गृह – अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु· प्रतीक्षा लेडांगे व्दितीय मेरीट आल्याबददल, वाणिज्य विभागाची विद्यार्थीनी कु. देवयानी पाठक सी.ए. ची परीक्षा पास झाल्याबददल तसेच
पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी आशिष वरघणे यांनी ‘जगण महाग होत आहे, या कथा संग्रहाचे लेखन केल्याबददल सन्मानचिन्ह व रोख पारीतोषिक देऊन गौपविण्यात आले. तसेच आंतर विद्यापीठ राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौपविण्यात आले.
या विविध स्पर्धेला परीक्षक डॉ. जया जॉन, डॉ.ए.सी. बाभळे, प्रा. आर. जी. महाकाळे, डॉ. जे. जे. शेंडे, डॉ. के. बी. भुते, डॉ. जे. के. जुमडे, डॉ. एम. के. तेलंग, प्रा. के. बी. ढोले, प्रा. व्ही. एम. पुनवटकर, डॉ.एम. एन. म्हैसकर, डॉ. के.बी. इंगोले, प्रा. पी.सी. वानखेडे, प्रा. एस. के. मस्के, डॉ. आर. एम. भगत, प्रा. के. डी. नवघरे, डॉ.ए.आर.सोमनाथे, डॉ.एस.ए. घरडे, डॉ. मनिषा दिघडे, प्रा. व्ही. एन. पानसे, प्रा. के. के. गंधारे, प्रा. एस एम पाटील, प्रा. रोकडे व सुबोध महाबुधे तसेच युवा महोत्सवाचे आयोजन करताना महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. जी. बी. आवारी चंद्रशेखर कुटे, श्रीमती सविता विटाळे आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची लक्षणिय उपस्थिती.