संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील पोंभुरणा येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील तहसिलचा पराक्रमामुळे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघात वनहक्क आदिवासी पट्टेधारक सात वर्षांपासून 7/12 पासून वंचित झाले आहे.
वेळावा येथील आदिवासी लक्ष्मण कुमरे यांना वनहक्क कायद्या अंतर्गत 0.90 हे. आर. जमिनीचा पट्टा सन.2010 ला देण्यात आला सदर पट्याचे फेरफार करून सातबारा देण्याबाबत पोंभुरना तहसिल कार्यालयाला आदिवासी लक्ष्मण कुमरे यांनी दिनांक 02/03/2016 ला अर्ज दिला मात्र सदर तहसिल ने आदिवासीच्या अर्जाची दखल घेतली नाही यामुळे पुन्हा दिनांक 2/01/2019 ला परत अर्ज केला सदर अर्जाच्या अनुषंगाने तत्कालीन तहसिलदार यांनी संबंधित तलाठी यांना पत्र दिले मात्र पत्राच्या अनुषंगाने कोणतीहि कार्यवाही करण्यात आली नाही यामुळे सदर आदिवासी नाम.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील असतांना सुद्धा सातबारा साठी अजूनही वणवण फिरत आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन आदिवासीला न्याय मिळणार काय असा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे.