विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- स्त्रीच्या अंगी असणारी सहनशक्ती ही महिलांना लाभलेली सर्वोत्तम देणगी आहे. सहनशीलतेच्या जोरावर आयुष्यामध्ये व संसारामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींवर महिला सहज मात करू शकते. आई, कन्या, बहीण, मैत्रीण, पत्नी अशा विविध भूमिका साकारत असताना तिला विविध प्रकारची कसरत करावी लागते. स्त्रीचे जीवन हे कष्टमय व त्यागमय आहे. त्या त्यागाची जाणीव म्हणून असे महिला दिन साजरे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत शिंदे यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. आजच्या काळात स्त्रीला सहानुभूतीची व समानतेची वागणूक मिळणे आवश्यक आहे. आणि ही जाणीव अशा कार्यक्रमामधून होत असते असे त्यांनी सांगितले. महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते ज्ञानेश्वर राजळे यांनी महिला दिन का साजरा करतात? याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्नेहा जेजुरकर – डॉक्टर, सई चोळके – किरण बेदी, दर्शनी जेजुरकर व धनश्री थोरात – राजमाता जिजाऊ, समृद्धी गोर्डे – इंदिरा गांधी, मयुरी सुलाखे – अहिल्यादेवी अशा विविध भूमिका साकारणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थिनींचा तसेच विद्यालयातील महिला सेविका निर्मला लावरे, प्रतिक्षा थोरात, छाया जेजुरकर, वृषाली बेल्हेकर, अर्चना हासे, सुमन कणसे, माई नरोडे, अनिता त्रिभुवन, मनीषा भालेराव या सर्वांचा याप्रसंगी स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच गावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन माजी सभापतीश्री निवास त्रिभुवन हे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी को-हाळे सिद्धी, आरंगळे श्रध्दा, नळे सिद्धी, बिडवे आदित्य यांनी महिलां विषयी मोलाचे विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक प्रमोद तोरणे, संतोष सोनवणे, सखाराम शिंदे, ज्ञानेश्वर केदार, सचिन चौधरी, लेखनिक सुनील बोठे, ग्रंथपाल रंजय कडू, संगणक शिक्षक अनिल घोडेकर, राजाराम थोरात यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कदम यांनी केले तर वृषाली बेल्हेकर यांनी आभार मानले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348