मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येते जागतिक महिला दिनाचे औचिक साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुष आणि महामया यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अगरबत्ती व मेणबत्ती लावून सामूहिक वंदना घेण्यात आली.
त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे भाषण झाली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयुणी वीणा अलोणे यांनी केले तर शारदा चालूरकर यावेळी आपल्या संबोधण्यात बोलताना सांगितले की, महिलांनी सक्षम होऊन एकजुटीने काम करावे असे प्रतिपादन यावेळी भाषनात केले. यावेळी इंदिरा करमे, शकुंतला दुर्गम यांनी गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमात शारदा चालूरकर, सुमन खोब्रागडे, नंदा करमरकर, कल्पना वाघमारे, शेंडे, अख्तर पठाण, अल्का कोंडागुरले, रेणू करमरकर, स्नेहा चालूरकर, दीक्षा चांदेकर, पिंगला उंदीरवाडे, रजनी उमरे, शीला चालूरकर, आशा फुलझेले, अनुसया खोब्रागडे, सुशीला जांभूळकर, वीणा अलोने, अनुला निमसरकर, पार्वता कोंडागुरले, शिंदू तावाडे, प्रीती करमे, मंगला झाडे, सुशीला भगत, चालुरकर, नविता टेंबून्ने, दिपाली सानुखे या विजेताना प्रमुख पाहुणेचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात महिला मोठया संख्येने उपस्थित होते.