पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- दि.०२/०३/२०२३ रोजी सीएफडी ग्राऊंड, खडकी, पुणे येथील निर्जन स्थळी एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळुन आल्याने पोलीस ठाणे खडकी गुन्हा रजि.क्र.८५/२०२३ भादवि कलम ३०२, २०१ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्ह्याचे तपासकामी तीन स्वतंत्र पथके तयार करुन वरिष्ठांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट-०४ कडील अधिकारी व अंमलदार हे करीत असताना, त्याअनुषंगाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास करीत असताना, एक जोडपे एका लहान मुलीला कडेवर घेवुन खडकी रेल्वे स्टेशन कडुन खडकी बाजाराकडे जाणा-या रोडच्या दिशेने जाताना दिसले. सदर जोडप्याने त्यांच्या कडेवर असलेल्या मुलीला घटनास्थळी टाकुन तेथुन पोबारा केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील मयत मुलीला घटनास्थळी ठेवुन पोबारा करणान्या जोडप्यापैकी अनोळखी इसम हा अकोला येथील गावातील असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ जिल्हा पोलीस अकोला येथील वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क करुन पुरुष व महिला या जोडप्याचे नावे निष्पन्न करुन त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याने ते त्यांचेसोबत ०२ वर्षाची मुलीस घेऊन पळुन गेले असलेबाबत माहिती प्राप्त केली. प्रेमी युगलाचा पिंपळे गुरव परिसरात शोध घेतला असता, संशईत आरोपी हा दापोडी गावठान येथील एका बांधकाम साईटवर काम करीत असलेबाबत खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. तात्काळ बातमीच्या ठिकाणी जावुन संशईत महिलेस व इसमास युनिटचे पथकातील पोलीसांनी १) संतोष देवमन जामनीक, वय- २५ वर्षे, २) एक महिला, वय २६ वर्षे, दोघे सध्या रा. वैदु वस्ती, पिंपळे गुरव, पुणे, मुळगांव रा. खिरपुरी, (बुद्रुक), ता. बाळापुर जि. अकोला यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी मुलगी वय- ०२ वर्षे ही त्यांच्या प्रेम संबंधात अडसर ठरत असल्यामुळे तीचा दोघांनी खुन करुन सिएफडी ग्राऊंड मधील निर्जन स्थळी टाकुन दिले असल्याचे कबुल केले आहे दोन्ही जोडप्यांना पुढील तपासकामी खडकी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे शाखा श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. नारायण शिरगावकर यांच मार्गदर्शन व सुचनीप्रमाणे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप- निरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस अंमलदार, महेंद्र पवार, हरिष मोरे, अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, संजय आढारी, सारस साळवी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, नागेशसिंग कुंवर, अशोक शेलार, मनोज सांगळे, शितल शिंदे व वैशाली माकडी या पथकाने केली आहे..