पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक-१ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अर्जदार यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी धानोरी येथील सावकाराकडून तीस हजार रुपये मासिक 15 टक्के व्याजाने घेतलेले होते. त्या बदल्यात चाळीस हजार रुपये देऊन सुद्धा गैरजदार यांनी अर्जदार यांची मोटरसायकल ठेवून घेऊन अजून पैशाची मागणी करत् असल्याबाबतचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.
प्राप्त तक्रारी अर्ज चौकशीमध्ये अर्जदार यांनी तीस हजार रुपये 15% व्याजाने घेतले असता त्या बदल्यात गैर अर्जदार यांना चाळीस हजार रुपये रोख दिलेले होते तरी गैरजदार यांनी अर्जदार यांची मोटरसायकल व गाडीचे पेपर सिक्युरिटीपोटी स्वतःकडे ठेवून अजून पैशाची मागणी करत करीत होता व पैसे मागणी करीत असताना अर्जदार व त्यांचे आई-वडील यांना रात्री घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी असल्याचे निष्पन्न झाल्याने गैर अर्जदार अक्षय विजय आल्हाट वय 25 वर्ष, रा. लेन न 3, सिध्दार्थ नगर, धानोरी, पुणे याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पो स्टे येथे गुन्हा रजिस्टर नंबर- 74/2023 भा द वि 387, 504, 506, व महा. सावकारी अधिनियम 39, 45* अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री. रामनाथ पोकळे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर मा.श्री. अमोल झेंडे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री.सुनील पवार सो, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर* यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे सो यांचे सूचनेप्रमाणे पोउनि विकास जाधव, पोलिस अंमलदार मधुकर तुपसौन्दर, संजय भापकर, प्रमोद सोनवणे , रवींद्र फुलपगारे, नितीन कांबळे, अमोल आवाड, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केली आहे..